वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…

वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.

घोटाळेबाजांना शिक्षा कधी ?

लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्‍यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !

‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !

लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.

चोख आणि प्रामाणिक काम हवे !

खासगी रुग्णालयांवर चाप बसवायलाच हवा. तिथे कुठल्याच शासकीय घटकाने भ्रष्टाचाराच्या स्वार्थांधतेला बळी पडून समाजद्रोह करायला नको. चोख आणि प्रामाणिक काम कोरोनाच्या साखळीला नक्कीच आटोक्यात आणील, यात शंका नाही !

समाजसाहाय्यासाठी पुढे या !

पुणे येथील संदीप काळे यांनी कोरोनाच्या संकटकाळाची आवश्यकता लक्षात घेऊन समाजसाहाय्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले. गेल्या वर्षभरापासून ते अत्यावश्यक सेवेतील लोकांना विनामूल्य रिक्शासेवा उपलब्ध करून देत आहेत.

लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !

शेकडो वर्षांपासून आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल उपयोगात आणत असल्यानेे ते निरोगी आणि दीर्घायुषी होते. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा उपयोग करून दीर्घायुष्यी जीवनाचा समतोल साधूया !

‘जिभे’चे चोचले !

मनाच्या आहारी जाऊन शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे, हा एक प्रकारे स्वैराचारच झाला. सोयीपेक्षा आवश्यकतेला प्राधान्य देणे, हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. शरीर म्हणजे भगवंताने दिलेली देणगी असून त्याच्या पालनाचे दायित्व स्वतःचे आहे, हे कळले पाहिजे. ‘जिभे’पेक्षा शरिराला काय हवे ? याकडे कटाक्ष असला पाहिजे.

कागदोपत्री वृद्धाश्रम !

जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.

हिंदूंनो, सावधान ! इतिहास पालटला जात आहे !

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !

कर्जबुडव्यांचे राखणदार शोधा !

देशातील १२ राष्ट्रीयीकृत अधिकोषांनी गेल्या ८ वर्षांत थकबाकीदार कर्जदारांची ६.३२ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे निर्लेखित (बुडीत) केली आहेत. यातील पावणेतीन लाख कोटींहून अधिक रकमेची कर्जे बड्या थकबाकीदारांची (१०० कोटी आणि त्यापेक्षा अधिक) आहेत.