Indore Dog Attack : इंदूर (मध्यप्रदेश) येथे कुत्र्यांनी २ वर्षांच्या मुलीवर केले प्राणघातक आक्रमण

डोक्यावर घालावे लागले ३५ टाके !

आक्रमणातील घायाळ मुलगी

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील पंचकुईया राममंदिर संकुलात २ वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या आक्रमणात मुलगी घायाळ झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून डोक्यावर ३५ टाके घालण्यात आले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिर परिसरात ५० हून अधिक भयानक कुत्रे आहेत, ज्यांनी भाविकांवर आणि गोठ्यातील गायी आणि वासरे यांच्यावर आक्रमणे केली आहेत. १९ मार्च या दिवशी ३ भाविकांचा कुत्र्यांनी चावा घेतला. या घटनेमुळे महामंडलेश्वर रामगोपालदासजी महाराज यांनी महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना दूरभाष करून कारवाईची मागणी केली. त्यांनी शहराबाहेर कुत्र्यांसाठी मोठे निवारागृह बांधण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

व्यक्तीने आक्रमण केल्यावर जर कायद्यानुसार त्याला शिक्षा होत असेल, तर भटक्या कुत्र्यांना शिक्षा का केली जात नाही ? कुत्र्यांमुळे प्राण जाणार असतील, तर अशा कुत्र्यांना ठार मारणेच आवश्यक आहे, याविषयी सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे !