Woman Killed Husband With Muslim Lover’s Help : मुंबईत मुसलमान प्रियकराच्या साहाय्याने हिंदु महिलेकडून पतीची हत्या !

२ मुसलमानांसह हिंदु महिलेला अटक !

मुंबई – येथील हिंदु महिलेने तिचा प्रियकर शाहरूखसाठी पती चंद्रशेखर याची गळा दाबून हत्या केली. यात तिला मोइनुद्दीन खान याने साहाय्य केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही धर्मांधांसह महिलेला अटक केली आहे.

पतीच्या मृत्यूविषयी पोलिसांना सांगतांना ती म्हणाली की, नवरा रात्री बाहेर गेला होता आणि परत येऊन झोपला. सकाळी उठल्यावर पाहिले, तर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले; पण पोलिसांना मृत चंद्रशेखर यांच्या अंगावर गळा दाबून मारल्याच्या खुणा आढळल्या. संशय आल्याने त्यांनी महिलेची चौकशी केली. तिच्या भ्रमणभाषमध्ये त्यांना शाहरूखचा क्रमांक सापडला. त्यानंतर पोलिसांनी शाहरूख आणि मोइनुद्दीन यांना अटक केली. त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली.

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असूनही धर्मांधाच्या प्रेमात आंधळे होऊन त्याच्यासाठी हिंदु पतीची हत्या करण्यापर्यंत हिंदु महिलेची मजल जाणे दुर्दैवी !
  • धर्मांधांसाठी पतीची हत्या करण्याचे महापातक हिंदु विवाहितेने करणे याला धर्मशिक्षणाचा अभावच कारणीभूत !