शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ? – दिवाकर रावते, शिवसेना

कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये ‘महार रेजिमेंट’ इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला ‘महार रेजिमेंट’चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण केले होते.

कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी साक्ष देण्यासाठी मुदत वाढवून घेण्यासाठी शरद पवार यांचे चौकशी आयोगाला पत्र

‘कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारी या दिवशी उपस्थित रहावे’, यासाठी चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स पाठवला होता.

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ६ घंटे साक्ष

रेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ४ फेब्रुवारी या दिवशी चौकशी आयोगासमोर ६ घंटे साक्ष नोंदवण्यात आली. या वेळी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले.

यापुढे कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाला अनुमती दिल्यास विरोध करू ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

वर्ष १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेले युद्ध जातीय नव्हते. इंग्रजांनी केलेला हा शुद्ध अपप्रचार आहे. समकालीन संदर्भ आणि पुरावे पडताळले असता हे सिद्ध होते.

भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे.  भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा ६ मास मुदतवाढ !

आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास आणि शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र.ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या विरोधातील ‘एन्.आय.ए.’ची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले.

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष होणार !

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने गोपनीय, तसेच इतर महत्त्वाची माहिती असल्याने पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे.

परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून समन्स !

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित रहाण्याविषयी समन्स (सूचना) दिले आहे.