मुंबई – ‘कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारी या दिवशी उपस्थित रहावे’, यासाठी चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स पाठवला होता. यावर पवार यांनी ‘या दिवशी उपस्थित रहाणे अडचणीचे होईल, त्यामुळे मुदत वाढवून घ्यावी’, असे पत्र आयोगाला पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाब मलिक यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
"भीमा कोरेगाव प्रकरणी काही दिवसातच शरद पवार…"; राष्ट्रवादी काँग्रेसने दिली माहितीhttps://t.co/sciRgyrOmh
पवार यांना पाठवण्यात आलेत चौकशीसाठी समन्स#SharadPawar #NCP #bhimakoregaon— LoksattaLive (@LoksattaLive) February 22, 2022
शरद पवार आयोगापुढे लवकरच साक्ष देणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसर्या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्यशासनाने न्यायमूर्ती जे.एन्. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला आहे. या दंगलीच्या प्रकरणी वर्ष २०१८ मध्ये काही जणांना अटक करण्यात आली आहे.