कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे सभा घेण्यास राज्यशासनाची बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्यशासनाने बंदी घातली आहे. यासह स्तंभाच्या ठिकाणी प्रवेशावर, तसेच पुस्तक, खाद्यपदार्थ आणि अन्य कक्ष उभारणे यांवरही निर्बंध घालण्याची सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.