मुंबई – कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणात शहरी नक्षलवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केलेल्या सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘एन्.आय.ए’ची ही याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.