युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल !

गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा मोठा वाटा !

‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !

माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली.

नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत.

सिंगापूर येथील प्राचीन मंदिरातील पुजार्‍याकडून मंदिरातील दागिने गहाण ठेवत मिळालेल्या पैशाचा अपहार

श्री मरिअम्मन या प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी कंदसामी सेनापती यांनी मंदिरातील मौल्यवान दागिने परस्पर गहाण ठेवत मिळालेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

फ्रान्सहित सर्वोपरि ।

जगाची पर्वा न करता स्वदेशहित जोपासणार्‍या फ्रान्सच्या प्रशंसनीय भूमिकेतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. फ्रान्सच्या तुलनेत जिहादी आतंकवादाने कैकपटींनी होरपळलेल्या भारताने यातून बोध घेणे आवश्यक आहे.

फ्रान्स संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने संमत केला इस्लामी कट्टरतावादी विधेयकाचा मसुदा !

भारतातही अशा प्रकारचा कायदा करावा, अशी मागणी आता देशातील राष्ट्रप्रेमी जनतेने केंद्रातील भाजप सरकारकडे केली पाहिजे !