पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली. अन्य एका घटनेत बॉम्बस्फोटात १ सैनिक ठार, तर २ जण घायाळ झाले.

ही आक्रमणे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून करण्यात आल्याचा दावा पाकने केला आहे. ही संघटना पाकपासून बलुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी कार्य करत आहे.