गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

  • यातून चीन त्याचा खोटारडेपणा लपवण्याचा कसा प्रयत्न करत आहे, हे पुन्हा एकदा लक्षात येते ! अशा चीनसमवेत भारताने नेहमीच सतर्क रहाणे महत्त्वाचे !
  • मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ? चीन अशांना भीक घालणार नाही, हे त्यांना ठाऊक असल्याने त्या गप्प आहेत !
गलवान खोर्‍यात झालI भारत आणि चीन सैन्यात संघर्ष

बीजिंग (चीन) – गलवान खोर्‍यात झालेल्या भारत आणि चीन सैन्यातील संघर्षाविषयी चीनच्या अधिकृत भूमीकेविषयी प्रश्‍न उपस्थित करणार्‍या तिघा चिनी पत्रकारांवर चीनने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. यांतील शोध पत्रकार शू झिमिंग यांना नानजिंगमधून अटक करण्यात आली. चीन सरकारने या संघर्षात मृत झालेल्या सैनिकांची जी संख्या घोषित केली, त्यावर शू झिमिंग यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘भारताने त्याचे सैनिक हुतात्मा झाल्याचे लगेच मान्य केले, मग चीनला हीच गोष्ट मान्य करण्यासाठी ८ मास का लागले ?’, असा प्रश्‍न शू झिमिंग यांनी उपस्थित केला.

भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या मते ४५ चिनी सैनिक या संघर्षात ठार झाले, तर चीनने ८ मासांनी केवळ ४ सैनिक ठार झाल्याची अधिकृत माहिती घोषित केली. चीनमधील ‘ब्लॉगर्स’नी चिनी सरकारचा दावा मान्य करण्यास नकार देत, अधिक जीवितहानी हानी झाल्याचे म्हटले आहे.