‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !

वॉशिंग्टन (अमेरिका) – नासाचे ‘पर्सीवरेन्स’ रोव्हर मंगळावर यशस्वीरित्या उतरण्यातील माझ्या सहभागामध्ये भारतीय संस्कारांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन यांनी या घटनेनंतर केले. रोव्हर यशस्वीरित्या लँड केल्याची सर्वांत पहिली माहिती फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन यांनी दिली. स्वाती मोहन या नासामध्ये गाइडेन्स, नेव्हीगेशन आणि कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती मोहन एक वर्षाच्या असतांना त्यांचे कुटुंब अमेरिकत स्थायिक झाले. स्वतःच्या यशातून भावी पिढीला मार्गदर्शन करतांना त्यांनी म्हटले की, स्वतःची जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यावर ठाम रहा. कुठलाही एक अनुभव किंवा एक यश तुम्हाला पुष्कळ यशस्वी किंवा पराभूत करू शकत नाही. यश असो की अपयश त्या अनुभवातून तुम्ही काय आणि कसे शिकलात हे सर्वांत महत्त्वाचे असते. हे अनुभव तुम्हाला पुढे जाण्यास साहाय्य करतात.
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !