युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

  • एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल !
  • ‘ख्रिस्ती हे प्रेम आणि शांती यांचे पुरस्कर्ते असतात’, अशी ख्रिस्त्यांची प्रतिमा आहे. त्याला उघडपणे छेद देणार्‍या ख्रिस्त्यांच्या धर्मगुरूंना अशी वागणूक दिली जाते, असे समजायचे का ? यावरून व्हॅटिकन चर्चचे खरे स्वरूप लक्षात येते !
कार्डिनल रॉबर्ट सारा

व्हॅटिकन सिटी – जर युरोपमधील मुसलमान शरणार्थींचा पूर असाच येत राहिला, तर लवकरच संपूर्ण जगात इस्लामची आक्रमणे चालू होतील. त्यामुळे व्हॅटिकन सिटीने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केल्यावरून आफ्रिकेचे ७५ वर्षीय कार्डिनल रॉबर्ट सारा यांना ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पदावरून हटवले आहे.

त्यांनी ही मागणी वर्ष २०१९ मध्ये केली होती. रॉबर्ट सारा आफ्रिकी खंडातील गिनी देशातील रहाणारे आहेत. गेली २० वर्षे त्यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये महत्त्वांच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते तेथील पूजा आणि धार्मिक अनुष्ठान याचे काम पहात होते. विशेष म्हणजे चर्चच्या कायद्यानुसार ७५ वर्षांनंतर कोणताही पाद्री पदावर राहू शकत नाही.

तरीही पोपच्या अनुमतीमुळे काही पाद्री ७५ वर्षांनंतर पदावर रहात होते; मात्र रॉबर्ट सारा यांना ही अनुमती देण्यात आली नाही. त्यांनी मुसलमान शरणार्थींविषयी केलेले विधान, हे त्यामागील कारण आहे, असे बोलले जात आहे.