प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातही ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.  

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे.

कोल्हापूर येथे होणार अखिल भारत हिंदु महासभेचे महाधिवेशन !

कोल्हापूर येथे तब्बल १४ वर्षांनंतर होणार्‍या या महाधिवेशनामुळे जिल्ह्यातील हिंदु महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील ‘ई-पास’ची सक्ती रहित !

जोतिबा देवस्थान येथील हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ, भाविक यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनाचे संघटित यश !

लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?

देशात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक अहवाल  

देशातील फुटीरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव हे मोठे आव्हान आहे. जसजसा जनगणनेचा काळ जवळ येत आहे, तसे ‘आम्ही हिंदू नाही’ हे सांगण्यासाठी समुदायांना उद्युक्त केले जात आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला.

सूरत (गुजरात) येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले श्री गणेशाचे चित्र हिंदु संघटनांनी पुसले !

सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ?