विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू ! – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी मी अवगत आहे. येथील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल यांनी दिले. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने त्यांची २४ ऑगस्ट या दिवशी पंचायत समिती सभागृहात भेट घेऊन निवेदन सादर केले. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले. निवेदनामध्ये विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित हटवून गडावरील मंदिरे आणि स्मारके यांचा जिर्णाेद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी भाजप उपजिल्हाप्रमुख श्री. राजू प्रभावळकर, मलकापूर नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, सर्वश्री हर्षद पोतदार, रूपेश वारंगे, महेश गांगण, मुकुंद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय गांधी, श्री. जितेंद्र पंडित उपस्थित होते.