केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’

कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) – अनेक साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी वर्षभर पंचगंगा नदीत मिसळते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कृती करत नाही. केवळ गणेशोत्सव, तसेच हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते. अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कचखाऊ भूमिका घेते. हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी केले. ते समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त बोलत होते. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी २२ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत करण्यात आले.

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना श्री. राजू यादव
कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. शरद माळी, तसेच सनातन संस्थेच्या सौ. प्रीती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी शिवसेनेचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू सांगावकर, पेठवडगाव येथील भाजप युवामोर्चाचे सरचिटणीस श्री. राजेंद्र बुरुड, नागदेववाडी येथील भगवा रक्षक संघटनेचे कार्यकर्ते, शिरोली येथील धर्मप्रेमी श्री. संतोष चौगुले, भुयेवाडी येथील धर्मप्रेमी सर्वश्री पवन कवठे, महेश पाटील, रवींद्र खोचीकर, प्रकाश चौगुले, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, संतोष सणगर, प्रीतम पवार, शशांक सोनवणे, मधुकर नाझरे यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.

विशेष

१. आंदोलनप्रसंगी पाऊस असूनही हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

२. आंदोलनाच्या ठिकाणी एका गोमातेचे आगमन झाले होते.

३. परिसरात असणारे अनेक हिंदू, तरुण युवक, युवती आंदोलनाचा विषय ऐकत होते.