हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केेलेल्या विरोधाचा परिणाम

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुन्नवर फारुकी

नवी देहली – हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुन्नवर फारुकी याच्या राष्ट्रीय राजधानीत होणार्‍या ‘डोंगरी टू नोव्हेअर’ या विनोदी विशेष कार्यक्रमाला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगून देहली पोलिसांनी अनुमती नाकारली. कार्यक्रम आयोजित केल्यास त्याला विरोध करण्याची चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने दिली होती.

विश्‍व हिंदु परिषदेच्या देहली शाखेचे प्रमुख सुरेंद्रकुमार गुप्ता यांनी मुन्नवर फारूकी याचा वादग्रस्त कार्यक्रम रहित करण्याची मागणी देहली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. ‘मुन्नवर फारूकी याचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम म्हणजे हिंदूंच्या देवतांची विटंबना करण्यासाठी नियोजित प्रचार आहे. द्वेषयुक्त भाषण आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे या गंभीर गोष्टी आहेत’, असे या निवेदनात म्हटले होते. यापूर्वी मुन्नवर फारूकी याचा बेंगळुरूमध्ये होणारा कार्यक्रम ‘जय श्री राम सेना’ या हिंदु संघटनेने केलेल्या तक्रारीवरून रहित करण्यात आला होता.

हिंदु जनजागृती समितीकडूनही देण्यात आले होते कार्यक्रम रहित करण्यासाठी पोलिसांना निवेदन !

निवेदन देताना समितीचे कार्यकर्ते

देहली – हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची पार्श्‍वभूमी पहाता, सामाजिक अन् धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी २८ ऑगस्टचा नियोजित कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने कमला मार्केट पोलीस ठाण्यामध्ये दिले होते. या वेळी ब्राह्मण स्वाभिमान सभेचे अध्यक्ष पंडित ब्रिजेश शर्मा आणि येथील मंदिर पुजारी शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रम होणार्‍या ‘केदारनाथ सहानी ऑडिटोरियम’लाही भेट देऊन स्थानिक अधिकार्‍यांशी चर्चा केली. ऑडिटोरियमच्या वतीनेही हा कार्यक्रम रहित करत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !