युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !

हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन ! वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’च्या वतीने पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज यांची स्वच्छता !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले.

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

पेण (जिल्हा रायगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची धर्मांधाकडून रंग लावून विटंबना !

केवळ क्षमायाचना नव्हे, तर महापुरुषांची विटंबना करणार्‍यांना कडक शासन व्हायला हवे, तरच अशा घटना थांबतील !

किरकोळ कारणावरून अंबड (जिल्हा जालना) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु युवकाची हत्या !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात जे दाखवले आहे, तेच जालन्यात पुन्हा घडले आहे आणि तेव्हाप्रमाणे आजही पोलीस, प्रशासन आणि सरकार गप्प आहेत ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदु बांधवांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण घोषित करण्यात आले होते.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात विविध हिंदु संघटनांचे ध्येय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ असल्याचा पुनरुच्चार !

कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच अधिवेशन घेण्यात आले. हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले, हे अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.

अमरावती येथे मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करण्याचा संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांचा निश्चय !

अमरावती जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा नुकताच पार पडला. यामध्ये विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातही ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.