(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा त्यांना ठार मारण्याची धमकी आल्याचा दावा !

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा केला आहे. एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, या लोकांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) म. गांधी यांचा अंत केला. ते काय मला सोडणार आहेत ? गांधी यांना गोडसे याने गोळी मारली होती. तरीही ते (हिंदुत्वनिष्ठ) गोडसे याची पूजा करतात.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, मी सावरकर यांच्या फलकांना विरोध करत होतो. सावरकर यांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती. (काँग्रेसची गोबेल्स नीती ! – संपादक) त्यांना ते (हिंदुत्वनिष्ठ) ‘वीर सावरकर’ म्हणतात. सावरकरांशी माझे वैयक्तिक शत्रूत्व नाही; मात्र यांचे आचरण चांगले नव्हते. शिवमोग्गा येथील मुसलमानबहुल भागात भाजपने सावरकर यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनीही छायाचित्र लावू दिले. पण ते (भाजपवाले) मुसलमान भागात जाऊन असे का करतात ? टिपू सुलतान याच्या चित्राला विरोध का करतात ? (टिपू सुलतान याने लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, त्यांना ठार मारले, तसेच असंख्य हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले. यामुळेच त्याला विरोध केला जातो ! टिपू काँग्रेसचा वंशज असल्याप्रमाणे काँग्रेसला त्याचा पुळका  येत असतो, हे लक्षात येते ! – संपादक)

हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप यांच्याकडून विरोध

सिद्धरामय्या यांच्या वरील विधानांनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोडगु येथे त्यांच्या चारचाकी गाडीवर अंडी फेकण्यात आली, तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

संपादकीय भूमिका 

  • भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !
  • गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात काँग्रेसवाल्यांनी सहस्रो ब्राह्मणांना ठार मारल्याचा आरोप आहे. वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीत काँग्रेसवाल्यांवर साडेतीन सहस्र शिखांच्या हत्या करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या दोन नेत्यांना शिक्षाही झाली आहे, याविषयी सिद्धरामय्या का बोलत नाहीत ?