गोंदिया येथील सर्व मंदिरे, मठ आणि संस्था यांनी हिंदु जनजागृती समितीसमवेत एकत्र येऊन कार्य करावे ! – पू. रामज्ञानीदास महाराज, संस्थापक, तीरखेडी आश्रम

गोंदिया येथील पिंडकेपार गौरक्षण येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेचा गोंदिया येथील जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर सर्वच मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक !

शेवटचा श्वास असेपर्यंत मठ, मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होत आहेत. संघटन, साधना या दिशेने मार्गक्रमण करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार होऊया.

डाव्या (साम्यवादी) विचारसरणीची विषवल्ली रोखण्‍यासाठी सजग राजकीय भूमिका आवश्यक ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्‍या विचारांची मांडणी करून ते पोचवण्‍यासाठी आवश्यक परिसंस्‍था त्‍यांच्‍याकडे आहे.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ तात्काळ रहित करा ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

Illegal Construction State Wide Agitations : सांकवाळ (गोवा) येथील वारसा स्थळावरील चर्च संस्थेने केलेले अतिक्रमण न हटवल्यास हिंदू राज्यव्यापी आंदोलन छेडणार !

पत्रकार परिषदेत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पुराव्यांसह चर्च संस्थेने ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी कशा प्रकारे अतिक्रमण केले आहे ? याचा पाढाच वाचला.

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा !

वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी !

वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करावी.

Anti-Conversion Act : बिलिव्हर्सचा पास्टर डॉम्निक याला गोव्यातून तडीपार करा, गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करा !

धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा.

मिरज येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात श्रीराम मंगल अक्षता कलश शोभायात्रा पार पडली !

अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश पालखीची भव्य शोभायात्रा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात काढण्यात आली.