पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू रुग्णालयात भरती

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले.

वैयक्तिक वाहिनीवरून सत्संग शृंखलेचे प्रसारण करणारे अमरावती येथील मानव बुद्धदेव यांचा सत्कार !

सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

यवतमाळ येथील ‘महिला उत्थान मंडळा’च्या वतीने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना निवेदन !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच ते ८ वर्षांपासून कारागृहात असून विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती  

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.