संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

जोधपूर (राजस्थान) – गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने मान्य केले आहे.

 (सौजन्य : Vipul Garg Yuva – Motivational speaker)

यावर जानेवारी २०२१ च्या तिसर्‍या आठवड्यात सुनावणी होणार आहे. पू. आसारामजी बापू यांनी याचिकेत म्हटले आहे की, मी ८० वर्षांचा वृद्ध असून वर्ष २०१३ पासून कारागृहात बंद आहे. माझ्या जामिनावरील याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यात यावी.