यवतमाळ, ११ मार्च (वार्ता.) – कथित आरोपाखाली कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक ‘महिला उत्थान मंडळा’च्या वतीने ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिनानिमित्ताने भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच ते ८ वर्षांपासून कारागृहात असून विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन देतांना महिला उत्थान मंडळाच्या सौ. दीपाली वैद्य, सौ. नीताताई मुंदाफळे, युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.