दस्तनोंदणी अधिनियम कायद्यात पालट : मिळकतीच्या ओळखीचे प्रावधान !
वर्ष २०२३ मध्ये राज्य सरकारने दस्तनोंदणी (कागदपत्रे) अधिनियम कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ एप्रिल या दिवशी स्वाक्षरी केली.