नवी देहली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते. अडवाणी यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
एक सांसद के रूप में संवाद पर उनकी आस्था ने संसदीय परंपराओं को समृद्ध किया। गृह मंत्री तथा उप प्रधान मंत्री के रूप में, उन्होंने सदैव राष्ट्र हित को सर्वोपरि रखा, जिससे उन्हें दलगत सीमाओं से परे जा कर लोगों ने सम्मान और प्रशंसा प्रदान की। भारत के सांस्कृतिक पुनरुत्थान के लिए उनके… pic.twitter.com/e4QYXQt0tX
— President of India (@rashtrapatibhvn) March 31, 2024
आदल्या दिवशी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात ४ जणांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी तो स्वीकारला होता. यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् यांचा समावेश होता.