Goa Padmashri Award : सावईवेरे (गोवा) येथील शेतकरी संजय पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शेतकरी संजय पाटील यांना ‘पद्मश्री’ प्रदान करतांना

पणजी, ९ मे (वार्ता.) : सावईवेरे, फोंडा येथील शेतकरी संजय पाटील (वय ५८ वर्षे) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली. नवी देहली येथील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा झाला.

श्री. संजय पाटील

संजय पाटील यांना यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये गोवा सरकारचा ‘गोवा कृषी रत्न’ पुरस्कार, वर्ष २०१५ मध्ये ‘गोवा बागायतदार’चा फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, नवीन देहली येथील ‘ईकार- भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ‘इ.ए.आय्.आर्.’ नावीन्यपूर्णता असलेला शेतकरी पुरस्कार आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’चा वर्ष २०२३ मध्ये अन्य एक पुरस्कार मिळालेला आहे. शेतकरी संजय पाटील हे नैसर्गिक शेती करून त्याविषयी इतरांनाही मार्गदर्शन करतात.