वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेले निर्णय, ही देशाची ओळख ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या ‘डिजिटल नेटवर्क’(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे.

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर तिन्ही सैन्यदल, अर्धसैनिकदल, पोलीस दल आदींनी संचलन केले. तसेच विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले.

(म्हणे) ‘आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?’

कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती मुर्मूंसह जगभरातील ५०० जागतिक नेते उपस्थित रहाणार !

‘स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदूंचे प्रमुख शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या राष्ट्रपती उपस्थित नव्हत्या’, हे हिंदूंनी लक्षात ठेवले आहे !

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती !  

‘विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे’, अशी घोेषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली.

वारकरी संप्रदायाने केलेला सत्कार म्हणजे साक्षात् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या श्रद्धेवरील पुरोगाम्यांची टीका आणि खंडण !

ब्राह्मण पंडित मंत्रोच्चार करत राष्ट्रपतींना वेदोक्त पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी देवाला प्रार्थना करत आहेत, हे पाहिल्यानंतर पुरो(अधो)गाम्यांचा तीळपापड होणे, हे समजू शकते. त्यांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.

‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.