नवी देहली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३० मार्च या दिवशी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आले. या चौघांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे; मात्र ते या कार्यक्रमात प्रकृती चांगली नसल्याने उपस्थित राहू शकले नाही. त्यांना उद्या, ३१ मार्च या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अडवाणी यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार देणार आहेत.
LIVE: President Droupadi Murmu presents Bharat Ratna Awards at Rashtrapati Bhavan https://t.co/KDAJF6vvOK
— President of India (@rashtrapatibhvn) March 30, 2024
राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात आतापर्यंत हा पुरस्कार मिळवणार्यांची संख्या ५३ झाली आहे.