राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी साधला युतीच्या खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद !

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै या दिवशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे खासदार अन् आमदार यांच्याशी संवाद साधला. १८ जुलै या दिवशी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्मू मुंबई येथे आल्या होत्या.

शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

जनतेचा कौल लक्षात घेता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक !

शासन किंवा प्रशासन यात निःस्पृह आणि निःस्वार्थ लोकांची वानवा आहे. हल्ली एखादे पद मिळाल्यास आणि त्या अनुषंगाने आलेले अधिकार मिळाल्यास त्याचा नेहमीच जनतेच्या हितासाठी वापर होतो, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कृतीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत !

झारखंडमध्ये गेल्या ११ मासांमध्ये १ सहस्र ६५७ बलात्कार

अशा बलात्कार्‍यांना तात्काळ फासावर चढवायला हवे, तरच या प्रकारच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच जनतेला धर्मशिक्षण देऊन सुशिक्षित करणे आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे, हीच काळाची आवश्यकता आहे !