Nana Insulted Hindus:नाना पटोले यांचे विधान म्हणजे हिंदूंचा अपमान असून त्यांना शिक्षा होणे आवश्यक ! – महंत नारायण गिरी, जुना आखाड्याचे प्रवक्ते

राष्ट्रपतींनी श्री रामल्लाची पूजा केल्याने काँग्रेसचे नाना पटोले यांनी फुकाचा आक्षेप घेतल्याचे प्रकरण

मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीराममंदिराला भेट देऊन श्रीरामल्लाची पूजा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘इंडी आघाडी सत्तेवर आल्यानंतर आम्ही अयोध्येत राममंदिराचे शुद्धीकरण करणार आहोत. शंकराचार्य याला (मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला) विरोध करीत होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर चारही शंकराचार्य राममंदिराचे शुद्धीकरण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर उभारणीत प्रोटोकॉलच्या (राज शिष्टाचाराच्या) विरोधात काम केले आहे’, असे विधान केले होते. यावर अनेक संत-महंतांनी आक्षेप घेतला.

महंत नारायण गिरी

जुना आखाड्याचे प्रवक्ते महंत नारायण गिरी म्हणाले, नाना पटोले यांनी अतिशय बेताल वक्तव्य केले आहे. हा देशातील तमाम साधूंचा अपमान आहे. राष्ट्रपतींनी राममंदिरात पूजा केल्यानंतर नाना पटोले यांचे विधान म्हणजे मागासलेल्या समाजाचा अपमान आहे. ते हिंदूंचाही अपमान करीत आहेत. त्यांच्यासारख्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.’’

१. आध्यात्मिक नेते स्वामी दीपंकर म्हणाले, ‘‘नाना पटोले यांची कोणत्या प्रकारची मानसिकता आहे, हे मला समजू शकत नाही. ही जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याची मानसिकता आहे. अशा विचारसरणीवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे.’’

२. आचार्य डॉ. चंद्रांशु, राष्ट्रीय कथाकार आणि अयोध्येतील हिंदु धर्मगुरु म्हणाले, नाना पटोले यांचे विधान हे १४० कोटी भारतियांचा अपमान आहे. राममंदिराचे बांधकाम सर्व जातीच्या लोकांनी केले होते. काँग्रेसलाही निमंत्रण देण्यात आले होते; पण काँग्रेसवाल्यांना ते आवडले नाही.’’