भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना अटक

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ छाटणार्‍याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केल्याच्या प्रकरणी भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

केंद्र सरकारकडून अग्नीपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ

केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत सैन्य भरतीसाठीची असलेली वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे इतकी केली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे.

कठोर लोकसंख्या कायदा करण्याची शक्यता पडताळून पहाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे; कारण ते सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे कायदा करण्याविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवकीनंदन ठाकुर यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

बुलडोझरची कारवाई कायद्यानुसार झाली पाहिजे ! – सर्वोच्च न्यायालय

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या बुलडोझर कारवाईच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

निदर्शने करणार्‍या मुसलमानांकडून पंतप्रधान मोदी यांना अश्‍लाघ्य शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ लेखक तारेक फतेह यांच्याकडून प्रसारित  

कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे.

देहली उच्च न्यायालयाने भाजपच्या खासदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची माकपच्या वृंदा करात यांची याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्या वृंदा करात यांनी गुन्हा नोंवण्याची मागणी केली होती.

राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून दोन टप्प्यांत चौकशी

‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली.

शुक्रवारच्या नमाजानंतरच्या हिंसाचारामागे ओवैसी, पी.एफ्.आय. आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ! – जमात-उलेमा-ए-हिंदचा आरोप

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या सरकारला कशी मिळत नाही ?

स्थानिक तापमानवाढीमुळे हिमालयावर ताण : अल्प उंचीवर उगवणारी झाडे आता अधिक उंचीवर आढळतात !

विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्‍चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !

नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

नमाजाच्या वेळी मुसलमान संघटित होतात, तसेच आता हिंदूंनी प्रतिदिन संघटित होण्यासाठी ठिकठिकाणी महाआरती करावी आणि त्या वेळी हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, असा प्रयत्न हिंदूंनी युद्धपातळीवर चालू करावा !