आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लन यांनी अर्ध्या घंट्यात हटवले पूर्वीचे १७ हिंदुद्वेषी ट्वीट्स !

  • हिंदूंकडून चित्रपटाला विरोध होण्याची भीती !

  • भारताला संबोधले होते ‘लिंचिस्तान !’

(लिंचिंग, म्हणजे जमावाने ठेचून मारणे. यावरून ‘लिंचिस्तान’ असे संबोधण्यात आले आहे.)

नवी देहली – अभिनेते अक्षय कुमार यांचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला हिंदूंचा विरोध होऊ नये; म्हणून चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लन यांनी त्यांच्या यापूर्वी केलेले हिंदुद्वेषी ट्वीट्स हटवण्याची मोहीमच हाती घेतली आहे. १ ऑगस्ट २०२२ या दिवशी अर्ध्या घंट्यात त्यांनी १७ ट्वीट्स हटवले. त्यांनी एका ट्वीटमध्ये भारताला ‘लिंचिस्तान’ असे संबोधले आहे. काही जुन्या ट्वीटमध्ये त्यांनी मोदी सरकारला करण्यात येणार्‍या विरोधाचे समर्थन केले आहे, तसेच हिंदुत्वाचा अवमानही केला आहे.

गोतस्कर अकबर खान याच्या हत्येप्रकरणी कनिका यांनी भारताला ‘लिंचिस्तान’ म्हटले होते. त्यांनी लिहिले होते, ‘गोमातेचा अवमान सहन करणार नाही हिंदुस्थान-लिंचिस्तान.’ मध्यप्रदेशमधील खरगोन येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती, तेव्हाही कनिका धिल्लन यांनी त्याचे खापर हिंदूंवरच फोडले होते.

संपादकीय भूमिका

यामुळे हिंदुद्वेषी वृत्ती थोडीच पालटली जाणार आहे ! आता हिंदूंनीही अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना हिंदूऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !