गुजरातमध्ये पाक कमांडो घुसण्याची शक्यता

भारताने पाकचे कमांडो भारतात घुसण्याच्या पार्श्‍वभूमीवर बचावात्मक रहाण्यापेक्षा पाकमध्ये भारताचे कमांडो घुसवण्याचा आक्रमक प्रयत्न केला पाहिजे !

एटीएममधून १० सहस्र रुपयांहून अधिक रक्कम काढतांना ओटीपी लागणार !

ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) बंधनकारक केला आहे.

सरकारने सहकार्य केल्यास येत्या ३ वर्षांत मुंबईतील सर्व श्री गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्या आणू ! – बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मुंबईमध्ये शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्ती करण्यासाठी मूर्तीकार सिद्ध आहेत, तसेच गणेशोत्सव मंडळेही शाडूच्या मातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी सिद्ध आहेत; मात्र शाडूची माती उपलब्ध होण्यास अडचण येते.

गोमाता संरक्षण चळवळ उभारणार ! – संभाजी (बंडा) साळुंखे

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी २४ ऑगस्ट १९१९ या दिवशी देशात सर्वप्रथम कोल्हापूर येथे गोवंश हत्याबंदीचा आदेश दिला. २४ ऑगस्ट या दिवशी त्याला १०० वर्षे पूर्ण झाली.

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ

सातत्याने आतंकवादी आक्रमणाच्या सावटाखाली देशाला रहावे लागू नये, यासाठी सरकारने हा आतंकवाद कायमचा संपुष्टात आणण्याला पर्याय नाही !

स्वातंत्र्यदिनानिमित्त सातारा येथे ५ दिवसांचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा, संगममाहुली, वर्णे येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी पाच दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.

आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच पाकशी चर्चा होईल ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरवरही पाकशी चर्चा कशाला ? पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे जगजाहीर आहे आणि तो भाग परत घेण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आता थेट सैनिकी कारवाई करून हा भाग कह्यात घेणे, हेच भारताने केले पाहिजे !

डॉक्टरांना मारहाण करणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणारा कायदा केंद्र सरकार आणणार

कामावर असणार्‍या डॉक्टरला किंवा रुग्णालय कर्मचार्‍याला मारहाण केल्यास ३ ते १० वर्षे कारावास आणि २ ते १० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा असणारा कायदा केंद्र सरकार आणण्याच्या सिद्धतेत आहे.

(म्हणे) पैसे देऊन अजित डोवाल काश्मिरींना भेटत होते ! – काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मिरी जनतेला पैसे देऊन त्यांची भेट घेत होते. पैसे देऊन तुम्ही कोणालाही समवेत घेऊ शकता, असा आरोप काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

शामली (उत्तरप्रदेश) येथील पोलीस अधीक्षकांनी कावड यात्रेकरूचे पाय चेपले !

दुर्मिळ असलेले सेवाभावी पोलीस ! येथील पोलीस अधीक्षक अजय कुमार एका कावड यात्रेकरूचे पाय चेपतांनाचा ‘व्हिडिओ’ शामली पोलिसांच्या अधिकृत ‘ट्विटर अकाऊंट’वरून प्रसारित करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF