९ जानेवारीला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले ड्रोन प्रणालीचे उद्घाटन

रत्नागिरी – मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सागरी किनारपट्टीचे रक्षण आणि अवैध मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी मुंबई येथे ‘ड्रोन’ प्रणालीचे उद्घाटन केले. तेव्हापासून आतापर्यंत रत्नागिरी समुद्रकिनारपट्टीवर अवैधरित्या मासेमारी करणार्या १२ नौकांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभाग साहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी दिली.
ड्रोन प्रणालीचे उद्घाटन झाल्यापासून किनारपट्टीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अवैधरित्या मासेमारी करू नये, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.