प्रयागराज – पहिल्या अमृत स्नानाच्या दिवशी ड्रोनविरोधी यंत्रणेने ६ ड्रोन पाडले. हे सर्व ड्रोन पोलिसांची कुठलीही पुर्वानुमती न घेता उडवण्यात येत होते. सुरक्षेच्या कारणास्तव महाकुंभपर्वात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कुंभक्षेत्री ३ ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यांपैकी २ आर्.एफ्. (आधुनिक यंत्रणा) आधारित, तर उर्वरित १ रडार आधारित यंत्रणा आहे. आर्.एफ्. आधारित ड्रोनयंत्रणा ही ८ कि.मी. पर्यंत अवैध ड्रोन शोधून काढून २ कि.मी. पर्यंत त्याचा सिग्नल रोखण्यास सक्षम आहे, तर रडार आधारित ड्रोन यंत्रणेची १५ कि.मी. दूरपर्यंत अवैध ड्रोन शोधून काढून ३ कि.मी. च्या परिसरात ते ड्रोन निष्क्रीय करण्याची क्षमता आहे. कुंभक्षेत्री यापूर्वी ३ अवैध ड्रोन निष्क्रीय करण्यात आले असून निष्क्रीय करण्यात आलेल्या ड्रोनची संख्या आता ९ इतकी झाली आहे.