सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !
जळगाव, १७ जानेवारी (वार्ता.) – यावल येथील मशीद ट्रस्टने अनुमतीपेक्षा अधिक प्रमाणात म्हणजे अनधिकृत बांधकाम केले. म्हणून येथील पालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार मजहर अली इफ्तेखार खली आणि ख्वाजा मशीद मुस्लीम ट्रस्टचे अध्यक्ष शेख सैफुद्दीन शेख चांद यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदा १९६६ चे कलम ५२ (२) चे पोट कलम (अ), (ब)तसेच कलम ५४ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरातील बाबूजीपुरा भागात सिटी सर्वे क्रमांक ३३६७ या जागेत नगरपरिषदेची कोणतीही अनुमती, ना हरकत प्रमाणपत्र न घेता अनधिकृत बांधकाम केले. हे काम बंद करण्याची सूचना देऊनही ते थांबत नाही म्हणून १२ जानेवारीला हा गुन्हा नोंदवण्यात आला.