उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !

नायर रुग्णालयात डोक्यावर पंखा पडल्याने निवासी डॉक्टर घायाळ

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतांना ती रुग्णांसाठी खुली करण्यात आली.

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणार्‍या बसचालकवर गुन्हा नोंद

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाची क्षमता वाढवतांना १७० खाटांची सोय ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘कोविड’ रुग्णालयात आता १७० खाटा असणार, तसेच आवश्यकता भासल्यास एका घंट्याच्या आता अतिरिक्त ३० खाटा वाढवता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

जर्मन आस्थापन चीनमधून बाहेर पडून भारतात येणार

लावा इंटरनॅशनल या आस्थापनानंतर आता जर्मनीचे आस्थापन वॉन वेल्सनेही चीनमधील व्यवसाय बंद करून तो भारतात चालू करण्याचा निर्णय घेतला. हे आस्थापन बुटांचे उत्पादन करते.

संकटातून संधीकडे…!

संकटाचे संधीत रूपांतर करून जनसेवा करण्याचा आणि ‘जान है तो जहान है’, असे पंतप्रधान मोदी यांचे वाक्य उद्धृत करून कामगारांना प्राधान्याने साहाय्य करण्याचा मानस सीतारामन् यांनी बोलून दाखवला.

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

‘आत्मनिर्भर’ पंखांची गरुडझेप

कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्‍चितच प्रशंसनीय आहे.