बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणार्‍या बसचालकवर गुन्हा नोंद

मुंबई – बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे. अत्यावश्यक वाहनांमधून अवैद्यरित्या मद्याची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

या वेळी बसचालकाच्या केबिनमध्ये आणि बसच्या शेवटच्या बाकाखाली मद्यसाठा आढळला. मुंबई परिसरात सध्या मद्यविक्रीला प्रतिबंध आहे. त्यामुळे मुंबईतील काही टोळ्या अन्य मार्गाने वसई-विरार परिसरातील दुकानांतून मद्य विकत घेऊन ते मुंबईत तिप्पट दराने विकत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिकेमधून विदेशी मद्यसाठा कह्यात घेतला होता.