आगरा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चा पुतळा जाळला !

आगरा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाच्या बाहेर आणि शहरातील विविध शाळांच्या बाहेर राष्ट्रीय बजरंग दल अन् आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चे पुतळे जाळले. ‘सांता क्लॉज’ याला ‘फादर ख्रिसमस’ किंवा ‘सेंट निकोलस’, असेही म्हटले जाते.

रांची (झारखंड) येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्‍या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

अशा प्रकारची विधाने करणारे नेते असणार्‍या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

सूरत (गुजरात) येथे ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’ आयोजित करणार्‍या उपाहारगृहावर  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आक्रमण

शत्रूराष्ट्राचा उदो उदो करणार्‍यांना ‘देशद्रोही’ घोषित करून सरकारने त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

सोलापूर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम मंदिरात शौर्यदिन साजरा !

अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्यापासून प्रतिवर्षी ६ डिसेंबरला विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अयोध्येसह देशभरात शौर्य दिवस साजरा केला जातो.

विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

मिरज येथील हिंदु धर्मशाळेत अकारण उच्छाद माजवणार्‍या व्यसनाधीन समाजकंटकांचा बंदोबस्त करा !

बजरंग दलाचे गांधी चौक पोलीस ठाण्यात निवेदन

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?