राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस–प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

कोल्हापूर – १४ नोव्हेंबर या दिवशी रात्री ८ वाजता एक गाडी शाहुवाडीतून देशी गाई घेऊन कत्तलीसाठी शाहूवाडी येथून घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली. ही माहिती समजताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावून ६ गायी आणि २ वासरे यांना वाचवले. यातील दोन गायी या गरोदर होत्या. या गायी भुयेवाडी येथील ‘योगेश्वर गोशाळा’ येथे सोडण्यात आल्या आहेत. (जी गोष्ट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कळते ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पालिसांना का कळत नाही ? – संपादक)
या अभियानात बजरंग दल जिल्हाध्यक्ष सुरेश रोकडे, पन्हाळा तालुका गोरक्षा अध्यक्ष पवन उगळे, तालुकाप्रमुख विशाल परीट, कोडोली गोरक्षाप्रमुख प्रथमेश काईंगडे, कोडोली उपाध्यक्ष शिवराज मगदुम, प्रथमेश पाटील, लखन मेनकर, रामभाऊ बगले, विकी पाटील यांसह २५ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !