रांची (झारखंड) येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

  • एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्‍या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • झारखंडमध्ये हिंदुद्वेषी ʻझारखंड मुक्ती मोर्चाʼचे सरकार असल्यामुळे तेथे हिंदुत्वनिष्ठ नेते असुरक्षित असल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक
मुकेश सोनी

रांची (झारखंड) – विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे येथील खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची १५ डिसेंबर या दिवशी खलारी पोलीस ठाण्याच्या सीमेमधील मॅक्लुस्कीगंज भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुकेश सोनी हे खलारी येथील महावीर नगरमध्ये रहात होते आणि मॅक्लुस्कीगंज येथे ‘प्रधान ज्वेलर्स’ नावाचे त्यांचे दागिन्यांचे दुकान आहे. मुकेश यांच्या हत्येची माहिती मिळताच संपूर्ण खलारीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुकेश सोनी सायंकाळी त्यांचे दुकान बंद करून घरी परत जात असतांना बकुळीया तांड येथे त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यात ते घायाळ झाले. या वेळी काही लोकांनी मुकेश सोनी यांना डाक्रा रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

झारखंडला केरळ आणि बंगाल बनवण्याचे षड्यंत्र ! – खासदार संजय सेठ

खासदार संजय सेठ

मुकेश सोनी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी खासदार संजय सेठ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ‘भाजप, रा.स्व. संघ आणि विश्‍व हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. झारखंडला बंगाल आणि केरळ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे’, असे खासदार सेठ यांनी म्हटले. स्थानिक आमदार समरीलाल यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.