सरकारी कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यास बसपच्या धर्मांध खासदाराचा विरोध !

उत्तरप्रदेशातील अमरोहा येथील घटना

डावीकडून बसपचे खासदार दानिश अली आणि भाजपचे आमदार डॉ. हरिसिंह ढिल्लो

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येणार्‍या ‘अमृत रेल्वे स्थानक’ योजनेच्या अंतर्गत अमरोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार डॉ. हरिसिंह ढिल्लो यांनी ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे बसपचे खासदार दानिश अली भडकले आणि त्यांनी यास विरोध केला. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या भाजप आणि बसप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी कार्यक्रमात काही वेळ तणाव निर्माण झाला. सरकारी अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आली.

६ ऑगस्ट या दिवशी वरील योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात अमरोहा येथील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. दानिश अली यांचे म्हणणे होते की, हा भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे रेल्वे स्थानक भाजपला नव्हे, तर राष्ट्राला समर्पित केले आहे. यामुळे पक्षाचे समर्थन करणार्‍या घोषणा या कार्यक्रमात देऊ नयेत. (भारतमाता की जय’, ही भाजप पक्षाची घोषणा कुठे आहे ? प्रत्येक भारतीय, ज्याला या देशाविषय अभिमान आहे, तो ही घोषणा देतो. स्वतःची कट्टरता लपवण्यासाठी दानिश अली असे स्पष्टीकरण देत आहेत ! – संपादक) डॉ. ढिल्लो यांनी सांगितले की, ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देणे, हा आमचा अधिकार आहे. याला होणारा विरोध सहन केला जाणार नाही.

संपादकीय भूमिका 

  • ‘भारतमाता की जय’ म्हटल्याने ज्यांचे पित्त खवळते, ते भारतात का वास्तव्य करतात ? या देशाविषयी ज्यांना काहीच वाटत नाही, ते या देशासाठी प्राणार्पण तर सोडाच देशाच्या उत्कर्षात तरी काय हातभार लावणार ? अशांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • अली यांच्यासारख्यांचा भरणा असलेला बहुजन समाजवादी पक्ष राष्ट्रहित काय साधणार ? अशा पक्षावर बंदी घालणे आवश्यक !
  • भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्‍या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !