Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण

रायपूर (छत्तीसगड) – हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी श्री नीलकंठ सेवा संस्थानने केली आहे. श्री नीलकंठ सेवा संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी रायपूर उत्तर विधानसभेचे आमदार श्री. पुरंदर मिश्रा यांना या मागणीविषयी एक निवेदन सादर केले आहे. श्री नीलकंठ सेवा संस्थानचे संस्थापक श्री नीलकंठ त्रिपाठी यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य हे हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. अलीकडेच त्यांनी ‘हिंदु धर्म एक धोका आहे’, असे संतापजनक विधान केले होते; मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. त्रिपाठी यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी कठोर कायदा होणे आवश्यक !