Swami Prasad Maurya : (म्हणे) ‘औरंगजेब नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता ! – स्वामी प्रसाद मौर्य, बहुजन समाज पक्ष

बहुजन समाज पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे विधान

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – औरंगजेब इतिहासातील सर्वांत क्रूर आणि सर्वांत वाईट बादशाह मानण्यात येतो. तो वाईट होता; पण तो नथुराम गोडसेपेक्षा अधिक चांगला होता, असे माझे म्हणणे आहे.

नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता म. गांधी यांची हत्या केलीे. जे लोक दुसर्‍याकडे बोट दाखवतात, त्यांनी अगोदर आपल्या व्यक्तीकडे पहावे, असे विधान उत्तरप्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

भाजप देशात द्वेष पसरवत असल्यामुळे देशातील विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

संपादकीय भूमिका

  • या विधानातून मौर्य यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे !
  • मुसलमानांच्या मतांच्या लाभासाठी अशा प्रकारची विधाने करून हास्यास्पद ठरणारे मौर्य !