तुम्ही भाजपमध्ये मंत्री असतांना सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाहीत ? – मायावती, बहुजन समाज पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्‍न !

डावीकडून मायावती आणि स्वामी प्रसाद मौर्य

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी ‘बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रासह देशातील हिंदूंची अनेक मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते. या सर्वांचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले पाहिजे’, अशी मागणी केली होती. यावर  बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी टीका केली आहे.

मायावती यांनी म्हटले की,  मौर्य काही वर्षे भाजप सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाही ? निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारचा धार्मिक वाद निर्माण करणे, हे मौर्य आणि समाजवादी पक्ष यांचे अश्‍लाघ्य राजकारण आहे. बौद्ध आणि मुसलमान याला बळी पडणार नाहीत.