हज यात्रेवरील अनुदान बंद करून कोट्यवधी रुपयांची विमानप्रवास सवलत देणे, ही हिंदूंच्या डोळ्यातील धूळफेकच ! – हिंदु जनजागृती समिती

हज यात्रेवरील अनुदान बंद करून कोट्यवधी रुपयांची विमानप्रवास सवलत देणे, ही हिंदूंच्या डोळ्यातील धूळफेकच, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहु खामणकर यांनी केले.

हिंदुद्रोही निर्णय !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय देऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे धार्मिक क्षेत्रात ढवळाढवळ करायची, या दुटप्पी काँग्रेसी धोरणातून घेतलेला एक धर्मद्रोही निर्णय, असेच याचे वर्णन करावे लागेल.

केंद्र सरकारकडून हज यात्रेकरूंसाठी तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात

केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद केले असले, तरी हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात केली आहे,

धुळे शहरात अफझलखानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांचा विरोध !

अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.

परतूर (जिल्हा जालना) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि जाळपोळ

जिल्ह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून जाळपोळ केली. यात १० ते १२ जण घायाळ झाले.

ईशान्य भारताला मुसलमानबहुल बनवण्याचा प्रयत्न होत आहे ! – सैन्यप्रमुख बिपीन रावत

आसाममधील मौलाना बद्रुद्दीन अजमल यांची ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (ए.आय.यू.डी.एफ्.) ही संघटना गेल्या काही वर्षांमध्ये भाजपपेक्षाही वेगाने वाढत आहे.

मुसलमान समाजाशी संवाद साधण्यासाठी भाजप राज्यातील मुसलमानबहुल भागांत संवाद यात्रा काढणार

राज्यभरातील मुसलमान समाजाशी संवाद साधण्यासाठी ४ मार्चपासून राज्यातील मुसलमानबहुल भागांत भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याच्या वतीने संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘नागालॅण्डमध्ये सत्तेवर आल्यास जेरुसलेमची विनामूल्य यात्रा घडवू !’ – भाजपचे ख्रिस्त्यांना आमीष

नागालॅण्डमध्ये आम्ही निवडून सत्तेवर आल्यास ज्येष्ठ ख्रिस्ती मतदारांना त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जेरुसलेमची विनामूल्य यात्रा घडवू, असे आमीष भाजपने ख्रिस्ती मतदारांना दिले.

(म्हणे) ‘हिंदूनेच हिंदूला मारले; मात्र मुसलमानांवर आरोप !’ – समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव

‘कासगंजमध्ये मुसलमानांवर अन्याय होत आहे. हिंदूनेच हिंदूला मारले असून मुसलमानांवर आरोप करण्यात येत आहेत. तेथे निरपराध लोकांना अटक करण्यात येत आहे. त्यांना सोडले पाहिजे.’ धर्मांधांकडून चंदन गुप्ता यांच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी !

काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांवर गोळीबार केला म्हणून सैनिकांवर फौजदारी गुन्हा नोंद

शोपियां जिल्ह्यात दगडफेक करणार्‍या तरुणांना पांगवण्यासाठी सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याने थेट सैनिकांच्याच विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथे २७ जानेवारी या दिवशी घडला.


Multi Language |Offline reading | PDF