(म्हणे) ‘केवळ इस्लामच प्रेम आणि विश्‍वास यांचा संदेश देतो !’

‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसरवणारे ग्रंथ’ म्हणणारे बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांचे जुने विधान आले समोर !

चंद्रशेखर यादव आणि निखिल आनंद

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारचे शिक्षणमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी ३ दिवसांपूर्वीच ‘मनुस्मृति’, ‘रामचरितमानस’ आणि प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या ग्रंथांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, असे म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यात ते म्हणत आहेत, ‘प्रेम आणि विश्‍वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे. आपल्याला द्वेष पसरवणार्‍यांशी लढायचे आहे. द्वेष पसरवणार्‍यांचा पराभव होऊ दे आणि विश्‍वासाचा संदेश देणार्‍यांचा विजय होऊ देे.’

१. हा व्हिडिओ चंद्रशेखर यादव यांच्या फेसबुक खात्यावर ४ मे २०२२ या दिवशी अपलोड करण्यात आला आहे. यात ते ईदच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. त्यांना एका पत्रकाराने प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील विधान केले.

२. भाजपचे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस निखिल आनंद यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना, ‘तुमच्या मंत्र्यांच्या अशा विधानांविषयी तुम्ही गप्प का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

संपादकीय भूमिका 

यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !