धारवाड (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री गणेशमूर्ती ठेवून आणि तिची पूजा करून आंदोलन करण्यात आले.

देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !

देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्‍या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्‍चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

आषाढी वारीला पायी जाण्याची अनुमती मिळावी, यासाठी आझाद मैदानावर वारकर्‍यांचे भजन आंदोलन !

आषाढी वारी पायी करण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या अनुमती द्यावी, यासाठी ३० जून या दिवशी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.

जळगाव येथील भुईकोट किल्ल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवलेली मोहीम !

मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.

कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !

आषाढी वारी पायी व्हावी यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन !

वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, तुकारामबीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व उत्सव शासनाच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कोणीही शासनाच्या विरोधात भूमिका न घेता आतापर्यंत सहकार्यच केले आहे.