आषाढी वारी पायी व्हावी यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन !

भजन आंदोलनात सहभागी उजवीकडे ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज आणि अन्य पदाधिकारी

सोलापूर, १७ जून (वार्ता.) – वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, तुकारामबीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व उत्सव शासनाच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कोणीही शासनाच्या विरोधात भूमिका न घेता आतापर्यंत सहकार्यच केले आहे. आषाढी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येत्या आषाढी वारीमध्ये पायी पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी अणि नियम घालून अनुमती द्यावी, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने येथे भजन आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

येथील जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार येथे हे भजन आंदोलन करण्यात आले. या वेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, तसेच सर्वश्री बळीराम जांभळे, जोतिराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.