जळगाव येथील भुईकोट किल्ल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवलेली मोहीम !

मुंबई – मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.

जळगाव – येथील ‘ऑनलाईन’ आंदोलनात हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, यावल येथील राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचे जळगाव जिल्हा दुर्गसंवर्धन अध्यक्ष डॉ. अभय रावते, चोपडा येथील माजी भाजप तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ बाविस्कर, भुसावळ येथील राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. शिशिर जावळे, करणी सेनेचे श्री. महेंद्रसिंह राजपूत आदी जण सहभागी झाले होते.

हिंदू राष्ट्र सेनेकडून जळगाव येथे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
हिंदु जनजागृती समितीकडून जळगाव येथे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूर जिल्हा आणि निपाणी-बेळगावसह (कर्नाटक) ३५ हून अधिक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, कार्यकर्ते यांचा ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग !

कोल्हापूर – या ‘ऑनलाईन’ आंदोलनात हातकणंगले, कागल, आजरा, करवीर, चंदगड, इचलकरंजी अशा विविध तालुक्यांतील, तसेच बेळगाव, निपाणी (कर्नाटक) येथील श्रीराम सेना कर्नाटक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, बजरंग बल, विश्व हिंदु परिषद अशा संघटना, राजकीय पक्ष यांचे ३५ हून कार्यकर्ते, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राजू कोपर्डे, श्रीराम सेना निपाणीतालुकाप्रमुख (कर्नाटक)
श्री. किरण कुलकर्णी, शिवसेना, कागल शहरप्रमुख
श्री. राजू यादव, शिवसेना, करवीरतालुकाप्रमुख
श्री. सतीश लोळे, हिंदुत्वनिष्ठ, इचलकरंजी

प्रतिक्रिया

१. श्री. राजेश पुरंत, निपाणी शहर, संयोजक मंत्री, विहिंप आणि बजरंग दल : स्वराज्य मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. स्वराज्यातील गडकोट मिळवण्यासाठी मावळ्यांनी अनेक लढाया केल्या, त्यांचे रक्त सांडले. अशा गडकोटांची आज दूरवस्था आहे. पारोळा (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्यात दुष्कृत्ये केली जात आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. पुरातत्व विभाग आणि सरकार नेमके काय करत आहे ? या दूरवस्थेची वेळीच नोंद घेऊन त्यावर योग्य कृती न केल्यास प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

सोलापूर जिल्ह्यातील ३० धर्मप्रेमींचा ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग !

सोलापूर – ‘ऑनलाईन’ आंदोलनात सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी असे ३० हून अधिक जण सहभागी झाले होते.