सीबीआयच्या कह्यातील ४५ कोटी रुपयांचे १०३ किलो सोने गायब

देशातील एका महत्त्वाच्या सुरक्षायंत्रणेकडून एका संवेदनशील प्रकरणात असा गलथानपणा होत असेल, तर त्याचा एकंदरीत कारभार कसा चालत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! यास दोषी असणार्‍या उत्तरदायींवर कारवाई करणे आवश्यक !

पोलीसदल शारीरिक आणि मानसिक तणावात असल्याने त्यात पालट होईपर्यंत कायदा सुव्यवस्था चांगली रहाणे कठीण ! – मद्रास उच्च न्यायालय

पोलिसांची अशी स्थिती होण्याला आणि ती तशीच ठेवण्याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

विधान परिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यत्वासाठी राज्यशासनाने दिलेल्या नावांपैकी ८ जणांच्या विरोधात न्यायालयात याचिका

एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात ५५ टक्के, तर उत्तर गोव्यात ५८.४३ टक्के मतदान

कोेरोना महामारीच्या सावटाखाली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ डिसेंबर या दिवशी ५६.८२ मतदान झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५५ टक्के, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५८.४३ टक्के मतदान झाले.

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे ‘मँगोनेट’ या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करा ! – विभागीय कृषी सह संचालकांचे आवाहन

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे मँगोनेट या संगणकीय प्रणालीवर नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येणार असून संबंधित आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या नावाखाली प्रशासनाने चालवलेली देवतांची विटंबना आणि देशाच्या संपत्तीचा अपवापर !

‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली केली जाणारी वृक्षतोड आणि भूमीचा केला जाणारा अपवापर, हे सर्व प्रकार देशाच्या दृष्टीने निरर्थक आणि बोधहीन असणे

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

केरळच्या मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

मुंबईतून १ कोटी ४० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

परदेशी नागरिक अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि त्यांनी स्थानिक माहिती गोळा केली.

गुरुकुंज मोझरी (जिल्हा अमरावती) येथे तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी भक्तांचे निषेध आंदोलन

राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुदेव भक्त आणि महिला यांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले.

वाकडमधील विकासकामावरून आमदार जगताप यांच्या समर्थकांचा सभागृहात गोंधळ

सभागृहात कसे वागायचे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणे अपेक्षित !